मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत होता. अखेर या चित्रपटाचा जबरदस्त टीजर रिलीज करण्यात आला आहे. टीजरमध्ये रणदीप हुबेहूब सावरकरांसाखा दिसत असलयाने आता या चित्रपटाबाबतची उत्कंठा आणखीन वाढली आहे.
रणदीप हा बॉलिवूडमधील अनुभवी अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या अभिनयासोबतच तो आपली व्यक्तिरेखा परिपूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. या चित्रपटाद्वारे रणदीप हुडाने दिग्दर्शक म्हणून देखील पदार्पण केले आहे. परंतु स्वातंत्र्यवीरांच्या भूमिकेसाठी त्याने आपला आहार आणि वजन यामध्ये देखील बदल केल्याचे समजते.
क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकरांच्या भूमिकेत येण्यासाठी रणदीप हुडाने 18 किलो वजन कमी केल्याचे वृत्त या आधी देखील आले होते, परंतु आता निर्माते आनंद पंडित यांनी एका खास मुलाखतीत खुलासा केला की रणदीप हुडाने विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी एकूण 26 किलो वजन कमी केले आहे.
आनंद पंडित म्हणाले, “तो त्याच्या व्यक्तिरेखेत खूप मग्न होता आणि आजही आहे. या व्यक्तिरेखेला पडद्यावर घेण्याआधीही, त्याने आपल्या भूमिकेत परफेक्ट दिसण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. वजन कमी करण्यासाठी तो दिवसभरात फक्त 1 खजूर आणि 1 ग्लास दूध प्यायचा.असं पंडित यांनी स्पष्ट केलं.
https://youtu.be/rGGXejre0MY
रणदीप नेहमीच आगळ्यावेगळ्या भूमिका साकारत असतो. ‘रिस्क’ चित्रपटातील त्याचा रोल असो किंवा वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईमधील पोलीस इन्स्पेक्टर असो रणदीप अगदी सहजतेणे आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडून जातो. वीर सावरकरांच्या व्यक्तिरेखेसाठी तो घेत असलेली मेहनत लवकरच सर्वांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.