R Madhavan: अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे. या पोस्टमध्ये त्याने आयकर विभागाचे कौतुक केले आहे. त्यामुळे सध्या त्याच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे.
आर माधवनने पोस्ट शेअर करत लिहिले की, “आमच्या कंपनीनं जेव्हा आयकर भरला त्यानंतर तीन आठवड्यांच्या आत त्याचे रिटर्न आम्हाला मिळाले. मला या विभागाचे कौतुक आणि आश्चर्य वाटते. त्यांनी मोठ्या वेगानं हे सगळं काम केले. “सोबतच माधवननं प्रधानमंत्री कार्यालय, वित्त मंत्री निर्मला सीतारमण, आयकर विभाग आणि वित्त मंत्रालय यांना देखील ही पोस्ट टॅग केली आहे.
The income tax refund for our company was received within 3 weeks after filing of return for AY 2023-24. The speed and promptness is simply unheard of ..The efficiency and transparency of the income tax department is unbelievable. Totally impressed and flabbergasted .…
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) November 13, 2023
या पोस्टनंतर नेटकऱ्यांकडून आर माधवनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘सर, खूपच छान वाटलं. तुम्ही या गोष्टीची दखल घेतली,’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर काही जणांनी यावर असहमती दाखवत ‘आम्हाला अजून रिटर्न मिळालेले नाही,’ असे म्हटले आहे.
दरम्यान, आर माधवन सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करताना पाहायला मिळतो. त्याच्या ‘रॉकेट्री’ या चित्रपटामुळे तो चर्चेत आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. अनेक पुरस्कार देखील या चित्रपटाला मिळाले आहेत.