मुंबई – ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे निधन झाले आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे आज सकाळी 10 च्या सुमारास निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या.
प्रशांत दामले हे मुंबई बाहेर होते. त्यांना जेव्हा आईच्या निधनाचे वृत्त समजले तेव्हा ते तातडीने मुंबईत पोहचले. विजया दामले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रशांत दामले हे नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रशांत दामले हे त्यांच्या “नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगसाठी जवळपास महिनाभर अमेरिका दौऱ्यावर जाणार होते.
येत्या 8 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर असा महिनाभर हा दौरा होता. कोणतेही नाटक असो, ते प्रशांत दामले यांच्या नावावर चालणारच, अशी खात्री असते. नाट्यक्षेत्रात त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी 12 हजार 500 व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा गाठला होता.