मुंबई – अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. सध्या हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. मात्र या कार्यक्रमादरम्यान कार्तिकने केलेल्या एका कृतीचे सर्वत्र चर्चा रंगली आहे. यावेळी त्याने चक्क स्टेजवर कियाराची चप्पल उचलली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कार्तिक आणि कियारा त्यांचे नवीन गाणे ‘सुन सजनी’ लाँच करण्यासाठी मुंबईतील अंधेरी येथे पोहोचले. यावेळी आर्यन आणि कियाराने येथे जबरदस्त डान्स केला. मात्र डान्स करण्यापूर्वी कियाराने स्टेजवर तिचे सँडल काढले. डान्स झाल्यानंतर कियारा तिची सँडल उचलण्याआधी कार्तिक आर्यनने कियाराची सँडल उचलली. कियाराने सँडल घालायला सुरुवात केली तेव्हा कार्तिकने तिला हाताने आधार दिला. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आर्यनने स्टेजवर कियाराची चप्पल उचलली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक हे प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचे सांगत आहेत तर काही लोक कार्तिक खूप सज्जन असल्याचे सांगत आहेत. यावेळी कियाराने सुंदर लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर कार्तिकने शेरवानी घातली होती.
https://www.instagram.com/reel/Ctw0DgUpsu7/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी रिलीज करण्यात आली असून, ती रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याआधी कार्तिक आणि कियारा ‘भूल भुलैया 2’ मध्ये एकत्र दिसले होते. हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता.