मुंबई – प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आजही आपल्या अभिनय आणि आवाजामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. 4 मुलांचे वडील धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची कमतरता नाही. आजही ते ज्या पार्टीत किंवा फंक्शनमध्ये पोहचतात, तिथे त्यांचे अनेक चाहते जमा होतात. अशात धर्मेंद्र यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते शहरातील लक्जरी लाईफ सोडून खेडे गावात राहण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळते.
धर्मेंद्र स्वतः त्यांच्या फार्महाऊसमध्ये शेकडो गायींची काळजी घेतात. पंजाबचे असलेले धरम पाजी हे भाजीपाला पिकवतात आणि त्यातून कमाईही करतात. धर्मेंद्र यांनी एकदा एका मुलाखतीत शेती आणि गाई-म्हशी पालनाबाबत सांगितले होते की, जोपर्यंत मी सकाळी शेण उचलत नाही तोपर्यंत माझा दिवस सुरू होत नाही. अशा स्थितीत धर्मेंद्रचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते गावात एन्जॉय करताना दिसत आहे.
87 वर्षीय धर्मेंद्र शहरापासून दूर एका फार्महाऊसमध्ये राहत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेत धर्मेंद्र दिसले होते. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी रणवीर सिंगच्या आजोबांची भूमिका साकारली होती.आपल्या वयोमानानुसार धर्मेंद्र फार कमी चित्रपट करतात.अशात त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना चांगलाच धक्का दिला आहे.
pic.twitter.com/uQOEYuV5MD Friends. Best way to enjoy ……A Pur skoon Life ☘️☘️☘️☘️☘️🙏.
— Dharmendra Deol (@aapkadharam) August 5, 2023
पंजाबमध्ये राहून धर्मेंद्र सध्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल सांगतात आणि प्रोत्साहित देताताना दिसतात. धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते खेडे गावात एका खाटेवर बसून चाहत्यांना मेथीबद्दल सांगत आहे. ते म्हणाले, ही मेथी आहे आणि आता याचा आम्ही पराठा बनवून खाणार आहोत. मी सध्या अशाच गावात राहून साध्या राहणीमानाचा आनंद घेत आहे.