मुंबई – अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती (health) खालावली असून त्यावरील वैद्यकीय उपचारांसाठी ते अमेरिकेत गेले असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्यानंतर स्वता: धर्मेंद्र (Dharmendra) यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचा निर्वाळा एका व्हिडीओद्वारे दिला आहे. आपण सुट्टीसाठी अमेरिकेत आलो आहोत असे त्यांनी चाहत्यांना सांगितले आहे आणि आपण लवकरच परतणार आहोत असेहीं त्यांनी म्हटले आहे.
धर्मेंद्र सध्या 87 वर्षांचे आहेत. ते अमेरिकेत गेल्याने त्यांच्या विषयी सोशल मिडीयात विविध अफवा पसरवल्या गेल्या आहेत परंतु त्यांनी अमेरिकेतील स्वताचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करून आपली तब्बात ठणठणीत असल्याचा दाखला दिला आहे. या व्हिडीओ मध्ये ते कुत्र्यासोबरत खेळताना दिसत आहेत.
लवकरच मी माझ्या नवीन चित्रपटासाठी परतणार आहे असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे. करण जोहरचा सुपरहिट चित्रपट “रॉकी और रानी की प्रेम कहानी”या चित्रपटात धर्मेंद्र यांचे दर्शन झाले होते. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणे थांबवले आहे.