Bharti Singh । ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर एका नवीन फॉर्ममध्ये आणि शैलीत परतला येतोय. या शोची जवळपास संपूर्ण टीम एकत्र आहे, पण यावेळी भारती सिंह यात सहभागी नाही. कपिल शर्माच्या शोमध्ये भारती त्याच्या मावशीच्या भूमिकेत दिसली होती.
याशिवाय भारतीने या शोमध्ये इतरही अनेक भूमिका साकारल्या आहे. मात्र भारती सिंग नव्या सीझनमध्ये नाही. सुनील ग्रोव्हर अनेक वर्षांनी नवीन सीझनसह शोमध्ये परतला आहे. भारती आणि कपिल शर्मा यांच्यात काही मतभेद झाले आहेत का? यावेळी तो ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा भाग का नाही? अशी चर्चा सोशलवर सुरु होती मात्र यावर आता भारतीने उत्तर दिल आहे.
द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये कपिल व्यतिरिक्त कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंह, राजीव ठाकूर आणि किकू शारदा असल्याची माहिती आहे. अलीकडेच निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो देखील जारी केला, ज्यामध्ये तेच कलाकार दिसले. पण भारती सिंग किंवा चंदू चायवाला म्हणजेच चंदन प्रभाकर दिसले नाहीत.
याबाबत भारती सिंहने सांगितले की, ‘सध्या माझा कपिल भाईसोबत जाण्याचा कोणताही विचार नाही. पण काही झाले तर मी त्यात नक्कीच सहभागी होईन. सध्या मी माझ्या प्रोजेक्ट्स, पॉडकास्ट, ‘डान्स दिवाने’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण मला फोन आला तर मी नक्की जाईन. सध्या माझ्या बॅगेत खूप गोष्टी आहेत आणि काहीतरी नवीन करायला वेळ कमी आहे.’
भारती सिंह अनेक सीझनमध्ये कपिल शर्मासोबत आहे, परंतु ती नवीन सीझनचा भाग बनली नाही कारण तिच्याकडे आधीपासूनच अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्यांच्याशी ती संबंधित आहे आणि वचनबद्ध आहेत.