पुणे(प्रतिनिधी) – मार्केट यार्डात फळ विभागात अनाधिकृतपणे विक्री करणे नऊ जणांना महागात पडले आहे. बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कारवाई करून 5 हजार 310 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. फळ विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या सुचनेनुसार गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.
करोनाच्या परिस्थितीमुळे मागील काही दिवसांमध्ये बाजार आवारात विना मास्क फिरणाऱ्या बाजार घटकातील व्यक्ती आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज (दि.27) अनाधिकृतपणे स्टॉल लावून विक्री करणाऱ्यांकडे बाजार समितीच्या कारवाईचा मोर्चा वळविण्यात आला.
नऊ अनाधिकृतरित्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दंड आणि जीएसटी मिळून प्रत्येकी 590 रुपये बाजार समिती प्रशासनाच्या वतीने वसुल करण्यात आले. या कारवाईमुळे अनाधिकृत विक्री करणाऱ्यांवर वचब बसणार आहे. या कारवाईचे विविध बाजार घटकांकडून स्वागत करण्यात येत आहे.