आता महापालिका घेणार स्वच्छ झोपडपट्टी स्पर्धा

पुणे -“स्वच्छ सर्वेक्षण 2020′ अंतर्गत आता महापालिका स्वच्छ झोपडपट्टी स्पर्धा घेणार असून, त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी 2 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

यामध्ये झोपडपट्टी, वस्तीतील स्थानिक मंडळ, बचतगट, शेजार समूह गट यांना सहभागी करून घेतले जाणार असून, स्पर्धेचे निकषही ठरवून देण्यात आले आहेत.

स्वच्छ झोपडपट्टी संदर्भत बैठका, प्रचार फेरी, प्रभात फेरी आणि तत्सम उपक्रम वस्तीमार्फत आयोजित करून याची जागृती करणे, स्पर्धा कालावधीत ओला आणि सुका कचरा प्रत्येक कुटुंबाने वेगळा करून ठेवणे आणि वेगळा देणे, ओला आणि सुका कचरा प्रत्येकी घरटी कचरा वेचकांकडे देणे अथवा कलेक्‍शन सेंटरवर देणे, महापालिकेच्या स्वच्छता ऍपवर शेजार समूह गट, बचत गट, स्थानिक मंडळ यांची नोंद करणे आणि वस्ती पातळीवर नागरिकांना स्वच्छता ऍपचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे तसेच वस्तीतील इतर नागरिकांना प्रोत्साहित करणे, सार्वजनिक स्वच्छता अभियान राबवणे, प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर न करणे आणि पाण्याचा वापर काटकसरीने करणे हे प्रमुख निकष लावले आहेत.

या सगळ्या निकषांची पूर्तता करून घेण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयांनी करायचे आहे. त्यांच्या क्षेत्रांतर्गत येणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये त्यांनी त्यासाठी यंत्रणाही उभी करायची आहे.

4 मार्चला पारितोषिक वितरण
15 ते 20 जानेवारी या कालावधीत स्वच्छ झोपडपट्टी विषयक अर्ज मागवण्यात येणार आहेत. 22 जानेवारी ते 22 फेब्रुवारीदरम्यान स्पर्धाविषयक संबंधित खात्यामार्फत नियोजित कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. 23 ते 25 फेब्रुवारी वस्ती पातळीवरील क्षेत्रीय कार्यालयांकडील परीक्षण होणार आहे. 26 ते 27 फेब्रुवारी रोजी शहर पातळीवरील परीक्षण होणार आहे. 4 मार्च रोजी पारितोषिक वितरण केले जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.