लंडन – दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज कॉलीन ऍकरमन याने सात गडी बाद करीत टी-20 सामन्यात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला. त्याने इंग्लिश कौंटी स्पर्धेत ही कामगिरी केली.
वॉर्विकशायरविरुद्ध लिस्टरशायरकडून खेळताना 28 वर्षीय खेळाडू ऍकरमनने 18 धावांमध्ये 7 गडी बाद केले आणि मलेशियाच्या आरूल सुपिया याचा विक्रम मोडला. आरूलने 2011 मध्ये सॉमरसेटकडून खेळताना ग्लॅमोर्गनविरुद्ध 5 धावांमध्ये 6 विकेट्स घेत विश्वविक्रम केला होता. त्याच्या या कामगिरीमुळेच लिस्टरशायरला 55 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.