हिंजवडी – प्रत्येक महिला आपल्या न्याय हक्कासाठी तसेच होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते. यासाठी तीला मानसिकदृष्ट्या सक्षम करत प्रत्येक क्षेत्रात संधी आणि काम करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे, असे प्रतिपादन शहराचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी वाकड येथे केले.
राहुल कलाटे मित्र परिवाराने आयोजित दीपोत्सव विशेष भव्य रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.दरम्यान डॉ. वृषाली माळी यांनी महिलांचे आजार व आरोग्यविषयक जागर करत महत्त्वपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी गायत्री बिरारी, चार्मी ठक्कर, दीपाली कलाटे, उषा कलाटे, मनीषा वाडघरे, दीप्ती कलाटे, सावेरी कलाटे, लीना कलाटे, अनिता वाडघरे, कांचन कलाटे, सपना कलाटे व नागरिक उपस्थित होते.
प्रेरणा पाटील (प्रथम), आरती जिभकाटे (द्वितीय), जयश्री महाजन (तृतीय), सुजाता पंडित, शिवांगी गंगाणी यांच्यासह वीस आकर्षक रांगोळी काढणार्या विजेत्या महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेत हिरारीने सहभागी प्रत्येक महिलेचा देखील या वेळी सन्मान करण्यात आला. प्रियांका कलाटे, सारिका कलाटे, मोनिका कलाटे, सारिका विनोदे, सीमा विनोदे, पूजा कलाटे, तनुजा कलाटे यांनी संयोजन केले. वृषाली राहुल कलाटे यांनी आभार मानले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून गेली चार ते पाच वर्षे दीपोत्सव निमित्ताने वाकडमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात येते. यामध्ये अनेक नोकरदार महिला, तरुणी तसेच गृहिणी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आकर्षक रांगोळ्या काढतात. त्यांच्यातील कलागुणांसाठी असे उपक्रम एक पर्वणीच ठरत आहे.
– राहुल कलाटे, माजी नगरसेवक