नागपूर – गोदिंया जिल्ह्यातील ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज सकाळी दाववा या गावाजवळ घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, एका ट्रॅक्टरमध्ये 16 जण शेतातील कामासाठी जात असताना दाववा गावासमीप एका ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॅक्टरला जोराची धडक दिली.
या धडकेमुळे ट्रॅक्टरचा मागील भाग पलटला आणि पुलावरून नाल्यात कोसळला. यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.