Accident News – केडगाव-पिंपळगाव रस्त्यावरील खुटबाव येथील शेलारवस्ती येथे पिकअप टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक (Accident News) झाली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरवार (दि.०५) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केडगाव पिंपळगाव रस्त्यावर खुटबाव येथील शेलारवस्ती नजीक एक भरधावं जाणाऱ्या पिकअप टेम्पो पिंपळगाव च्या दिशेने जात होता. त्याने खुटबाव गावात जाणाऱ्या दुचाकी स्वाराला धडक दिल्याने या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
या धडकेत मनोहर मुरुडकर (वय ५० वर्ष मूळ रा.बुलढाणा सध्या रा.खुटबाव ता.दौंड,जि.पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुरुडकर हे खुटबाव येथील प्रगतशील शेतकरी भोसले यांच्या शेतात शेतमजूर म्हणून मागील काही वर्षांपासून काम करत होते,
काही कामानिमित्त ते खुटबाव गावात जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला असून त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार असून परिवारात हे करते असल्याने या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे हवालदार अजिंक्य दौंडकर करीत आहेत.