3 हजार 734 पैकी 1 हजार 459 दाखलपूर्व खटले तडजोडीतून मिटवले
राजगुरूनगर- राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ठेवण्यात आलेल्या प्रलंबित व दाखलपूर्व 3 हजार 734 प्रकारणांपैकी पैकी 1 हजार 459 प्रकरणे तडजोडीतून मिटवण्यात आली. यावेळी लोकअदालतमध्ये तब्बल 1 कोटी 96 लाख 84 हजार 878 रुपयांची वसुली झाली आहे.
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 8) लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन न्यायाधीश एस. एन. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यायाधीश जी. बी. देशमुख, विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सह दिवाणी न्यायाधीश डी. बी. पतंगे, पी. डी. देवरे. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, विधी सेवा समितीचे दयानंद निकम, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष कड, उपाध्यक्ष ऍड. निलेश पवळे, ऍड.हर्षा पांडे, ऍड. सागर मैड, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. बी. एम. सांडभोर, ऍड. पोपटराव तांबे, ऍड सुलभा कोटबागी, ऍड. गोरक्षनाथ शिंदे, ऍड. वैभव कर्वे, ऍड. स्वाती आचार्य, ऍड. संजय पानमंद, ऍड. संदीप घुले, ऍड. रोहिदास टाकळकर, ऍड. विक्रम कड, ऍड. अमोल घुमटकर, ऍड. रेश्मा वाघुले यांच्यासह बार असोशिएशनचे पदाधिकारी, वकील, विविध विभागाचे अधिकारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकअदालतमध्ये न्यायालयातील न्यायाधीशांसह ऍड. पवन कड, ऍड. उज्वला माळी, ऍड.संदीप घुले, ऍड. रत्नमाला कौदरे, ऍड. निलेश आंधळे, ऍड. दीपाली वाळूंज, ऍड. सुषमा आरुडे, ऍड. अमोल टाकळकर या बार असोशिएशनच्या सदस्यांनी पॅनेल जज म्हणून काम पहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील बार असोशिएशनचे ऍड. सागर मैंड यांनी तर ऍड. हर्षा पांडे यांनी अभार मानले.
- राजगुरूनगरातील लोकअदालतला दरवेळी पक्षकारांचा मोठा सहभाग लाभला आहे. तडजोडीयोग्य प्रकरणात प्रलंबित असलेली प्रकरणे मिटवण्यात यावीत. उत्स्फूर्त सहभागाबद्दल सर्व पक्षकारांचे आभारी आहोत. लोकअदालतच्या माध्यमातून तडजोड योग्य जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करावा.
– डी. बी. पतंगे, सह दिवाणी न्यायाधीश, खेड न्यायालय - दाखलपूर्व दावे
खटल्याचा प्रकार…ठेवलेली प्रकरणे… तडजोड झालेल्या प्रकरणे… वसूल रक्कम (रुपयांत)
बॅंक रिकव्हरी…1 हजार 320… 11… 11 लाख 84 हजार 955
वीज वितरण…00…00…..00
पाणीपट्टी, घरपट्टी व इतर… 1 हजार 387… 1 हजार 387… 1 कोटी 26 लाख 47 हजार 194
एकूण… 2 हजार 707… 1 हजार 398… 1 कोटी 38 लाख 32 हजार 149 - प्रलंबित दावे
खटल्याचा प्रकार….ठेवलेली प्रकरणे… तडजोड झालेली प्रकरणे…. वसूल रक्कम (रुपयांत)
तडजोडयोग्य फौजदारी खटले… 159… 30… 28 हजार
धनादेश कलम…138…208…08… 11 लाख 36 हजार 478
बॅंक रिकव्हरी… 129…1… 59 हजार
मोटार अपघात… 17…2.. 12 लाख 90 हजार
भू संपादन…180…3..00
कौटुंबिक वाद… 112…4… 00
इतर दिवाणी खटले… 222…13…8 लाख 25 हजार
एकूण… 1 हजार 27… 61… 58 लाख 52 हजार 729