गंजम : ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात एक बसला भीषण आग लागली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. पीटीआयच्या वृत्तसंस्थानुसार, बसचा विजेच्या तारेला संपर्क झाल्यामुळे या बसला आग लागल्याची माहिती आहे. हि बस जंगलपाडु वरून चिकाराडा येथे जात होती.
यावेळी 11 किलोवॅट वीजेच्या ट्रान्समिशन लाईनला बसचा संपर्क झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अनेकांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. जखमींना बहामपूरच्या एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.