चाकण बाजारभाव : कांद्याची आवक घटूनही भावात घसरण
महाळुंगे इंगळे- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भावातही घसरण झाली. बटाटा, हिरवी मिरची, कोबी, वांगी, दोडका व दुधी भोपळ्याची प्रचंड आवक झाली. फळभाज्यांच्या बाजारात टोमॅटो, फ्लॉवर, भेंडी व कारल्याची आवक घटली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची आवक घटली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई बैल व शेळ्यां मेंढ्याच्या संख्येत घट झाली. तर म्हशींच्या संख्येत मोठी वाढ झाली. गेल्या महिन्या भरापासून जनावरांचे भाव स्थिर राहिले आहेत. एकूण उलाढाल 6 कोटी 70 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 17 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1 हजार क्विंटलने घटूनही भावात 900 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 3 हजार रुपयांवरून 2 हजार 100 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1 हजार 860 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या ही आवक 460 क्विंटलने वाढल्याने भावात 300 रुपयांची घसरण झाली. जळगाव, भुईमूग शेंगांची एकूण आवक 15 क्विंटल झाली. बटाट्याचा कमाल भाव 1 हजार 800 रुपयांवरून 1 हजार 500 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगांची आवक 14 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटलने घटल्याने भावात 900 रुपयांची वाढ झाली. या शेंगांचा कमाल भाव 11 हजार 100 रुपयांवरून 12 हजार रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक 3 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 2 क्विंटलने घटूनही भावात 1 हजार रुपयांची घसरण झाली. लसणाचा कमाल भाव 15 हजार रुपयांवरून 14 हजार रुपयांवर स्थिरावला.
चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 470 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 54 क्विंटलने वाढूनही भावात मोठी झाली. हिरव्या मिरचीला 2 हजार 100 ते 3 हजार रुपये असा भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव;
कांदा
क्रमांक एक : 2 हजार 100
क्रमांक दोन : 1 हजार 800
क्रमांक तीन : 1 हजार 200
एकूण आवक – 17 हजार क्विंटल.
बटाटा
क्रमांक एक : 1 हजार 860
क्रमांक दोन : 1 हजार 500
क्रमांक तीन : 1 हजार 300
एकूण आवक – 1 हजार 860 हजार क्विंटल.
फळभाज्या : प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 1,250 पेट्या (300 ते 600), कोबी : 460 पोती (200 ते 400), फ्लॉवर : 472 पोती (300 ते 500), वांगी : 416 पोती (1 हजार 500 ते 2 हजार 500), भेंडी : 485 पोती (3 ते 4 हजार), दोडका : 345 पोती (1 ते 2 हजार), कारली : 315 डाग (2 ते 3 हजार), दुधीभोपळा : 315 पोती (500 ते 1 हजार), काकडी : 394 पोती (500 ते 1 हजार), फरशी : 267 पोती (500 ते 1 हजार), वालवड : 468 पोती (1 ते 3 हजार), गवार : 190 पोती (3 ते 5 हजार), ढोबळी मिरची : 398 डाग (1 हजार 500 ते 2 हजार), चवळी : 295 पोती (1 ते 2 हजार), वाटाणा : 825 पोती (2 हजार 500 ते 3 हजार 500), शेवगा : 52 पोती (2 हजार 500 ते 4 हजार 500), गाजर : 310 पोती (1 ते 2 हजार).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची 90 हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला 501 ते 1 हजार रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची 70 हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना 301 ते 1,000 रुपये भाव मिळाला. शेपूची एकूण आवक 15 हजार जुड्या झाली असून, या जुड्यांना 201 ते 501 रुपये असा भाव मिळाला.
शेलपिंपळगाव येथील उपबाजारात मेथीची 2 हजार 300 जुड्यांची आवक होऊन मेथीला 400 ते 800 रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची 1 हजार 800 जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना 300 ते 800 रुपये भाव मिळाला. येथील बाजारात शेपू व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही.
चाकण बाजारात पालेभाज्यांचे दर (रुपयांत)
- मेथी : एकूण आवक : 11 हजार, 250 जुड्या (500 ते 900), कोथिंबीर – एकूण आवक : 21 हजार 520 जुड्या (500 ते 1 हजार), शेपू : एकूण 5 हजार 210 जुड्या (300 ते 500), पालक : एकूण 7 हजार, 580 जुड्या (200 ते 400 ).
- जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 45 जर्शी गायींपैकी 30 गायींची विक्री झाली. (10 ते 50 हजार रुपये), 90 बैलांपैकी 65 बैलांची विक्री झाली.(10 ते 35 हजार रुपये), 140 म्हशींपैकी 105 म्हशींची विक्री झाली. (20 ते 60 हजार रुपये), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 7 हजार 880 शेळ्या-मेंढ्यापैकी 6 हजार 990 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1 हजार 200 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला.