पिंपरी – पती, सासू आणि नणंद यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेचा गर्भपात केला. ही घटना चिंचवडगावतील वेताळनगर येथे घडली.पती अक्षय बाळू कांबळे, सासू आणि नणंद (तिघेही रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) अशी आरोपीची नावे आहेत. याबाबत विवाहितेने बुधवारी (दि. 3) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सप्टेंबर 2020 ते 3 मार्च 2021 या कालावधीत घडली.
लग्नामध्ये मानमान केला नाही. तू भिकारी आहेस, असे म्हणत शिवीगाळ करीत विवाहितेला मारहाण केली. 12 फेब्रुवारी रोजी पती एका महिलेला घेऊन आला. त्या महिलेला घरात घेणार असल्याचे विवाहितेला सांगितले. तसेच तुझ्या पोटातील बाळ माझे नाही, असे म्हणत पती, सासू आणि नणंद यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेचा गर्भपात झाला.