आमिर खान एका जाहिरातीसाठी घेतो तब्बल एवढी रक्क्म!

मुंबई – बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता ‘आमिर खान’ आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षांचे मने जिंकत आला आहे. आज पर्यंत आमिरने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. अमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असतो.

दरम्यान, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीतमध्ये आमिर खानचा समावेश झाला आहे.  मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर एका उत्पादनाचं प्रमोशन करण्यासाठी तब्ब्ल 11 कोटी रुपयांचं मानधन घेतो. तसेच आमिर चित्रपटासाठी मानधनापेक्षा प्रॉफिट शेअरिंगला प्राधान्य देतो. आमिर खान एखाद्या फिल्मच्या प्रॉफिटमध्ये 70 टक्के हिस्सा घेतो.

तर शाहरुख खान एका जाहिरातीसाठी 9 कोटी एवढी रक्कम घेतो. या रेट लिस्टमध्ये अमिताभ बच्चन तिसऱ्या क्रमांकावर असून, बिग बी एका जाहिरातीसाठी 8 कोटी रुपयांचं मानधन घेतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.