वाघोली – शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल वाघोली ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, माजी उपसरपंच कैलास सातव पाटील, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आमदार अशोक पवार यांच्यासारख्या अभ्यास व्यक्तिमत्त्वाचा ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला होणार आहे तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न बॅंकेच्या मार्फत सोडवण्यात आमदार अशोक पवार मोलाची कामगिरी करणार आहे असे माजी उपसरपंच कैलास सातव पाटील यांनी सांगितले.