मुंबई – “बाहुबली” या दाक्षिणात्य चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता प्रभास याचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “राधेश्याम” असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे हिने मुख्य भूमिका साकारली आहे .
हा चित्रपट राधाकृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. राधेश्याम हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असून त्यामधील नायक नायिकेचे नशीब कसं त्यांना एकत्र आणतं हे दाखवण्यात येणार आहे .
हा चित्रपट नव्या वर्षात जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र सध्याच्या करोना परिस्थितीत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. राधेश्याम या चित्रपटाच्या ट्विटर हँडलवरून चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे सांगितले आहे.
We have to postpone the release of our film #RadheShyam due to the ongoing covid situation. Our sincere thanks to all the fans for your unconditional love and support. pic.twitter.com/cC18q8jmOz
— Radhe Shyam (@RadheShyamFilm) January 5, 2022
राधेश्यामच्या टीमने प्रदर्शन पुढे ढकलल्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली असून लवकरच सिनेमा गृहात भेटू असंही म्हटलं आहे. प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यामुळे प्रभासच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.