कोरेगाव, (प्रतिनिधी) – सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून सूरज रामराव गायकवाड (वय 25, रा. जिहे, ता. सातारा, सध्या रा. मल्हारपेठ, सातारा) याला कोरेगाव येथे एमआयडीसीसमोरच्या मैदानावर रविवारी (दि. 18) दुपारी चौघांनी जातिवाचक शिवीगाळ करून, पाठीवर धारदार शस्त्राने वार केले.
याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मारामारी आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज गायकवाड हा बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी आला असता, निखिल बर्गे, साहिल बर्गे, दीपक राक्षे व एका अनोळखी युवकाने त्याला जातिवाचक शिवीगाळ करून, त्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. त्याला सातारा येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सपोनि सखाराम बिराजदार तपास करत आहेत.