मिझोरमच्या आयझल शहराच्या निसर्गरम्य सौंदर्यावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धबधब्याप्रमाणे उंचीवरून ढग वाहताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील बर्याच लोकांनी या दृश्याचे वर्णन “मंत्रमुग्ध करणारे” केले आहे.
हा व्हिडिओ फेसबुकवर अजीज बार्बुहियाने शेअर केला होता आणि तो व्हायरल झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर हजारो वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल क्लिपमध्ये ढग एका वरच्या पातळीवरुन खाली येताना दिसतात, अनेक जणांनी याचा उल्लेख ढगांचा धबधबा?,असा केला आहे.