पणजी : ५० वा इफ्फी म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पणजी गोवा इथं सुरु आहे. यंदा इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात समीर विद्वांस दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आनंदी गोपाळ’ ची निवड झालेली आहे. याविषयी आणि इफ्फीच्या अनुभवाविषयी खास डिजिटल प्रभातसाठी समीर विद्वांसने दिलेली ही मुलाखत.
”वेगवेगळ्या देशांमधील दर्जेदार असे चित्रपट इफ्फी मध्ये पाहता येतात, हा सर्वात मोठा इफ्फीचा असतो. जगभरातून येणारे चित्रपट पाहिल्यानंतर आपण त्या देशांना भेट देण्याचा फील आपल्याला येतो. त्या देशांमधील आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे याची माहिती मिळते. आनंदी गोपाळ च्या स्क्रिनिंग बाबत आम्ही सर्वच खूप उत्सुक आहोत. मी गेले काही वर्ष इफ्फीला येतोय. आणि मला कायम असं वाटायचं कि आपली एखादी फिल्म इफ्फी मध्ये असावी. आणि यावर्षी आनंदी गोपाळ ने ते माझं स्वप्न आहे. ”
– समीर विद्वांस