तेहरान : तेहरान येथील मुख्य विमान तळावरून उड्डाण केल्यानंतर युक्रेनचे विमान कोसळल्याने किमान 180 जण मरण पावले. या विमानातील कोणीही बचावले नसल्याचे वृत्त हाती येत आहे.
इराण रेड क्रिसेंटच्या ब्रेकींगदन्यूज या संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनसार, तेहरानच्या खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून हे विमान बुधवारी हवेत झेपावले, त्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामूळे ते कोसळले. या बोईंग विमानात बसलेल्यांपैकी कोणीही वाचले असण्याची शक्यता नाही. या बाबत आम्ही अधिक माहिती संकलीत करत आहोत, असे या संकेत स्थळाने म्हटले आहे.
तेहरानजवळच कोसळलेल्या या विमानात 180 प्रवासी होते. पीएस – 752 या विमानातून जाणाऱ्या या विमानातील कोणीही बचवाले असण्याची तिळमात्र शक्यता नाही, असे रेड क्रिसेंट या निमसरकारी वृत्त संस्थेने म्हटले आहे. दरम्यान, एएफपी या वृत्तसंस्थेने या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून 170 जण असल्याचे वृत्त दिले आहे.
180 प्रवासी घेऊन जाणारे हे विमान युक्रेनची राजधानी किव्हकडे जात होते. तेहरानच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात हे विमान कोसळले, अशी माहिती सूत्रांनी दिली.