मोरादाबाद – उत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद येथे लग्नाची तयारी सुरू असता अचानक इमारतीला आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहे.
लग्न असलेली इमारत ही तीन मजल्याची होती. या इमारतीला आग लागल्याची माहित मिळाताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच बंब दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप असष्ट आहे. मात्र शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी मोरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी अधिक माहिती दिली आहे. (A sudden fire broke out while preparing for the wedding; 5 people died)