सोरतापवाडी, (वार्ताहर)- मांजरी बाजार हा शेतकरी व ग्राहक यांच्यासाठी असून येथे खोतीदार व व्यापारी यांना बंदी घालावी यासाठी बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकारची आंदोलने झाली. त्यानंतर पुणे-सोलापूर माहामार्गलगत असणार्या कोरेगावमूळ (ता. हवेली) गावच्या हद्दीत पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीने उपबाजार उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हवेली कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक सुदर्शन चौधरी, स्वप्नील उंद्रे, स्थापत्य विभाग अभियंता प्रमोद तुपे, कोरेगाव उपबाजार विभागप्रमूख बापू जवळकर यांनी नुकतीच जागेची पाहणी केली आहे. पूर्व हवेली, दौंड व पुरंदर तालुक्यातील शेतकरी तसेच व्यापारी यांच्यासाठी हा उपबाजार सोयीस्कर होणार आहे. शेतकर्यांना मांजरी आणि पुणे मार्केट लांब पडत आहे.
त्यामुळे हा बाजार उभा करण्याचा निर्णय शेतकर्यांच्या हिताचा आहे. पुढील काही दिवसांत कोरेगावमूळ उपबाजाराचे काम सुरू होणार आहे. स्थापत्य विभागाकडून जागेची पाहणी केलेली आहे. या बाजारामुळे मांजरी बाजारात शेतकर्यांना खोतीदार व दुबार विक्रीवाल्यांचा त्रास होणार नाही व जागेची पण अडचण येणार नसल्याने शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोरेगावमूळ येथे 30 ते 35 ओटे बांधून ग्राहक येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. काही कालावधीसाठी बाजार फी माफ करून खोतीदाराने सकाळी 11. 00 ते 1. 30 वाजेपर्यंत त्यांनी आणलेला माल कोरेगावमुळ येथे विक्री करावा. उर्वरीत राहिलेला माल बाजार समितीच्या कर्मचार्यांना दाखवून त्याप्रमाणे त्याची नोंद पावती घेऊन उर्वरीत माल तो मांजरी उपबाजारामध्ये विक्रीस आणावा.-सुदर्शन चौधरी, संचालक बाजार समिती