थरकाप उडवणारा अपघात! बोगद्यात भिंतींवर रेल्वे धडकली; ३६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

ताइतुंग: तैवानमध्ये भीषण ट्रेन अपघात झाला आहे. गेल्या चार दशकातील या सर्वात भीषण ट्रेन अपघातात ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ७२ जण जखमी झाले आहेत. ट्रकला धडक दिल्यानंतर बोगद्यामध्ये ट्रेन रुळावरुन घसरुन हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.

या अपघातात ४० प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या महितीनुसार तैवानमध्ये एका बोगद्यातून रेल्वे जात होती. तेव्हा ट्रकला धडक दिल्यानंतर रेल्वे रुळावरून घसरली. रेल्वेमध्ये तेव्हा 350 प्रवासी होते. या अपघातात 36 प्रवाशांच्या मृत्यू झाला असून 72 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून पहिल्या चार डब्यांमधून ८० ते १०० प्रवाशांची सुटका करण्यात आली असून मागील चार डब्यांमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

हा अपघात आज शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास झला. प्रवाशांना वाचवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 60 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.वीकेण्ड असल्याने ट्रेनमध्ये अनेक पर्यटक प्रवास करत होते अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.