मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात भरती; ट्विटने वाढवली चिंता…

मुंबई – माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला रुग्णालयात भरती केलं आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तो घरातच क्वारंटाईन होता. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार त्याच्यावर औषधोपचार सुरु होते.

मात्र आज ट्विट करत त्याने आपण रुग्णालयात दाखल होत असल्याचं सांगितलं आहे. पुढील उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे, अशी माहिती त्याने ट्विट करुन दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या तसंच त्याची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशा मनोकामना व्यक्त केल्या होत्या. आजच्या ट्विटच्या माध्यमातून सचिनने त्याच्या चाहत्यांचे देखील आभार मानले आहेत.

दरम्यान ,आज भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकून बरोबर 10 वर्ष पूर्ण होत आहेत. याच संघाचा सचिन एक भाग होता. याच दिवसाचं निमित्त साधून सचिनने संपूर्ण भारतवासियांना तसंच संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.