सातारा: सातारा येथील पालिकेच्या घंटागाडीवर वाहक असलेला पालिकेचा कर्मचारी आज पेट्रोल विकताना सापडला. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात विष्णू शंकर गायकवाड (वय ५०, रा. चिमणपुरा पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूपुरी येथील भागीराज पेट्रोल पंपावर त्याने पालिकेचे कार्ड दाखवून दुचाकीमध्ये पेट्रोल भरले. तो घंटागाडीवर वाहक असताना दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असल्याने पंपचालकांचा त्यांचा वादही झाला. त्यानंतर तो चक्क पेट्रोल पंपाच्या बाहेरच येवून गाडीतील पेट्रोलची विक्री करताना आढळून आला. रात्री उशीरा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.