जिनिव्हा – जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून आतापर्यंत लाखो लोकांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोना विषाणूच्या दहशतीमध्ये असतानाच महासत्ता अमेरिका व जागतिक आरोग्य संघटनेदरम्यान कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवर कोरोना विषाणूबाबत अक्षम्य बेजाबदारपणाचे आरोप लावत आर्थिक रसद थांबवण्याचा निर्णय जाहीर केला होता. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस ऍधानॉम घेब्रेरियस यांनी अमेरिकी निधीविना संघटना अविरत सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला.
याबाबतची माहिती एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली आहे. डॉ. टेड्रॉस ऍधानॉम घेब्रेरियस यांनी याबाबत बोलताना, ‘अमेरिकेने निधी थांबवल्याने आम्ही आमच्या इतर सदस्य देशांशी बोलणी करत आहोत. निधीची कमतरता भरून काढून आम्ही आमचे कार्य अविरत सुरु ठेवण्याच्या दृष्टीने काम करत आहोत.’
ट्रम्प यांचे जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप
जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून होणारे अर्थसहाय्य रोखले जाईल, अशी घोषणा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याच्या करोना विषाणूच्या साथीच्या वातावरणामध्ये WHO केवळ चीन समर्थकाच्या भूमिकेतून कार्यरत आहे. ही संघटना केवळ चीनकडे लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप केला होता. चीन मधून येणारी हवाई वाहतूक थांबवण्याबद्दल केलेल्या सूचनेला जागतिक आरोग्य संघटनेने विरोध दर्शविल्याबद्दल त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.
WHO is reviewing the impact on our work of any withdrawal of US funding and will work with our partners to fill any financial gaps we face and to ensure our work continues uninterrupted: Tedros Adhanom Ghebreyesus, Director-General of WHO (World Health Organization) pic.twitter.com/ntajiYlZNl
— ANI (@ANI) April 15, 2020