मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र थोड्याच भूमिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. काही दिवसांपूर्वीच तिची ‘जुबली’ वेब सिरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या सिरिजसाठी तिला विशेष पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. याची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
अदिती राव हैदरीने “जुबली” मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रेलब्लेझर परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. यात तिने “सुमित्रा कुमारी ” हे पात्र अनोख्या पद्धतीने साकारले. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते.
अदितीने पद्मावत, रॉकस्टार, वजीर यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती संजय लीला भन्साळीच्या ‘हीरा मंडी’ या वेब सिरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सिरिजमधील तिचा फर्स्ट लुक समोर आला होता. याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान, अदिती आणि तमिळ अभिनेता सिद्धार्थ सूर्यनारायणसोबतच्या नात्याबद्दलही काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. आदिती आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट महा समुद्रम चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर अनेकवेळा ते मुंबईत एकत्र जेवण करतानाही दिसले. सिद्धार्थने जुबिलीच्या स्क्रीनिंग शोलाही हजेरी लावली होती.