ह्युस्टन : येथे एका इमारतीत मोठा स्फोट झाला. त्यामुळे किमान काही किलोमिटरपर्यंत त्याचा हादरा जाणवला. त्याभगात ढिगारा दिसत आहे.
पहाटे साडेचारच्या सुमारास हा स्फोट झला. या स्फोटाची माहिती ट्विटरवरून वेगाने फिरत आहे. या घटनेला सामोरे जात असल्याचे ट्विट ह्युस्टन पोलिसांनी केले आहे.
याबाबत जिवीत हानीचे कोणतीही माहिती तातडीने मिळू शकली नाही. या भागाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र काही रक्तबंबाळ माणसे दिसत असल्याचे स्थानिक टिव्ही चॅनेलने म्हटले आहे.
या स्फोटानंतर तेथे आग लागली असून अग्निशामक बंब तेथे रवाना झाले आहेत.