पिंपरी, दि. 17 – सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी हुलकावणी दिली. सलग दोन दिवस पाऊस पडल्याने वातावरणात गारवा होता. मात्र, तिसऱ्या दिवशी पाऊस पडला नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
पिंपरी चिंचवड शहरात सलग दोन दिवस पावसाच्या सरी कोसळल्या. बुधवारी रात्री आठ नंतर पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, नाशिकफाटा परिसरात गारांचा पाऊस झाला. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडवली होती. तर, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुसळधार पाऊस पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, आकुर्डी, निगडी, रावेत परिसरात झाला. शुक्रवारी मात्र, पावसाने हुलकावणी दिली. मात्र, दोन दिवस झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा होता. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली होती. तसेच अवकाळी पावसाने हुलकावणी दिल्याने नागरिकाही सुखावले.