इंदूर : प्राणीमात्रावर प्रेम करावं अशी शिकवण लहानपणापासूनच सर्वांना दिली जाते. त्यामुळे काही जण कुत्रा, मांजर अशा काही प्राण्यांना पाळतात त्यांना जीव लावतात. पण कधी कधी हे प्रेम अति झालं तर काय होत याच धक्कादायक उदाहरण मध्यप्रदेशातील इंदूर मधून समोर आले आहे.
दोन कुत्र्यांमध्ये झालेल्या भांडणावरुन त्यांच्या मालकांमध्ये वाद झाले आणि या भांडणाचे रूपांतर गोळीबारात झाले, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हा थरार घडला आहे. इंदूरच्या खजराना पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार घडला. राजपाल रजावत असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
#WATCH | Indore, MP: ” A man was walking his dog and his dog fought with his neighbour’s dog and this led to scuffle between the owners, some people gathered there due to the fight. The man suddenly went to his house and brought a gun and opened fire. 2 people were killed and 6… pic.twitter.com/Np8sPmkj3c
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 18, 2023
बँकेचा सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारा राजपाल रजावत हा गुरुवारी रात्री आपल्या कुत्र्याला बाहेर फिरवत होता. यावेळी त्याच्या कुत्र्याचे शेजारच्यांच्या कुत्र्यासोब भांडण झालं. यावरुन दोन्ही कुत्र्याच्या मालकांमध्ये वाद झाला. काही राजपाल राजावत त्याच्या घरात गेला आणि पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून उभा राहून एकामागून एक गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्यात शेजारच्या राहुल आणि विमल या दोघांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी दिली. खजराना पोलिसांनी या प्रकरणी राजपाल राजावत, त्याचा मुलगा आणि एका नातेवाईकाची आरोपी म्हणून नोंद केली आहे. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
शेजारच्यांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. गोळीबार होत असल्याचे पाहिल्यानंतर नागरिकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले. दरम्यान राजपाल रजावतचा दररोज शेजाऱ्यांसोबत वाद होत असते. या वादाचं कारण कुत्राच असायचं. कॉलनीतील अनेकांनी त्यांना याबाबत समजावलं होतं, पण त्याच्या कोणताही परिणाम झालेला नाही.