मुंबई – अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ही जोडी सध्या आगामी वेड या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश जेनेलिया सध्या सोशल मीडिया आणि मेन स्ट्रीम मीडियामध्ये जोरदार प्रमोशन करताहेत. त्यामुळे चित्रपटासह त्यांच्या खाजगी आयुष्यातील काही किस्से देखील सर्वांसमोर येत आहेत. नुकतंच रितेशने आपली मुलं कॅमेरा दिसताच हात का जोडतात याचा खुलासा केला आहे.
खर तर स्टार किड्स म्हंटल की सर्वसामान्यांना वेगळच कुतूहल असत. रितेश जेनेलिया मात्र आपल्या रियान आणि राहील या दोन्हही मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे राहण्याची शिकवण देत असल्याचे समजते. रितेश जेनेलिया स्टार्स असल्यामुळे अनेकदा मीडिया त्यांचे फोटो काढण्यासाठी तत्पर असतो त्यावेळी त्यांची मुले देखील त्यांच्यासोबत असतात. त्यावर एकदा रितेशच्या मुलाने त्याला हे लोक तुमचे फोटो का काढतात असा सवाल विचारला. यानंतर रितेशने दिलेले उत्तर सर्वांची मनं जिंकणार ठरलं.
रितेश म्हणतो ज्यावेळी माझ्या मुलाने मला हा प्रश्न विचारला त्यावेळी मी त्यांना सांगितले,”तुमचे आई बाबा जे काम करतात त्यासाठी ते लोक आमचे फोटो काढतात. तुम्ही आमची मुलं असल्यामुळे ते तुमचे देखील फोटो काढतात. त्यांनी तुमचे फोटो काढावेत असं तुम्ही काहीच केलेलं नाही,तरीही ते तुमचे फोटो काढतात म्हणून तुम्ही त्यांचे हात जोडून आभार मानायला हवेत” असं रितेशने त्याच्या मुलांना सांगितलं. म्हणूनच मुलं फोटो ग्राफरने फोटो काढल्यानंतर त्यांना नमस्कार करून आभार मानतात.