नवी दिल्ली – सध्या सोने आणि चांदीचे दर बऱ्याच उच्च पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्यामुळे गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 161 रुपयांनी कमी होऊन 53,235 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 1,111 रुपयांनी कमी होऊन 61,958 प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,770 डॉलर व चांदीचा दर 21.32 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे. त्याचबरोबर महागाई कमी होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे काही गुंतवणूक तिकडे जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले.