मुंबई – प्लॅनेट मराठी दरवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेत असते. प्लॅनेट मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी घेऊन आले आहे नवीन चित्रपट ‘न आवडती गोष्ट’. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पहिल्यांदाच LGBTQ या संवेदनशील विषयावर भाष्य केले जाणार आले आहे.
यात एका कुटुंबातील दोन बहिणींतील नात्याच्या प्रवासाची गोष्ट दाखवली जाणार आहे. समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आह. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सई देवधर यांनी केले असून यात मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, रेशम श्रीवर्धन आणि सायली संजीव, उदय टिकेकर, उषा नाईक, स्नेहा रायकर, वर्षा घातपांडे, निखिल रत्नपारखी, सक्षम कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.
सध्या महाराष्ट्रात समलैंगिक संबंधांवर मान्यता मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात वारंवार मागणी करण्यात येत असून, अजूनही त्या मागणीची पूर्तता झाली नाही. तरीसुद्धा यासारखा संवेदनशील विषय प्लॅनेट मराठी हाताळत आहे. आजही मध्यमवर्गीय कुटुंब ही परिस्थिती पचवू शकत नाही. असे असताना जर एखाद्या सामान्य कुटुंबात अशी घटना घडलीच तर ते कुटुंब ही परिस्थिती कशी हाताळेल. त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल, संपूर्ण कुटुंब कसे शेवटपर्यंत एकत्र राहणार, हे या सिनेमात हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. विनोदी चित्रपटाच्या माध्यमातून एक संवेदनशील विषयावर विचार करण्यास भाग पाडणारा हा चित्रपट आहे.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शिका सई देवधर म्हणतात, “या चित्रपटाचा विषय नाजूक असल्यामुळे तो विनोदी पद्धतीने मांडणे हे फार आव्हानात्मक होते. गंभीर विषय असला तरी चांगलीच पद्धतीने मांडला असल्याने हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन नक्कीच करेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.