“दिल, दोस्ती…’पासून सुरुवात आणि सुव्रत आणि सखी विवाहबंधनात

दिल दोस्ती दुनियादारी आणि ‘अमर फोटो स्टुडिओ’ अशा अनेक मालिका आणि नाटकांत बरोबर काम करणारे सहकलाकार सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे विवाह बंधनात अडकले. नेरळ येथील सगुणा बागेत विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात अगदी मोजके पाहुणे उपस्थित होते.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून ही जोडी प्रसिद्ध झाली होती. सखी ही दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. अभिनयाबरोबरच फोटोग्राफीची तिला आवड आहे. इकडे सुव्रत जोशी याने नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा येथून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. त्याला रंगभूमीवर काम करण्याची अत्यंत आवड आहे. तर सुव्रतने “शिकारी’, “पार्टी’, “डोक्‍याला शॉट’ यासारख्या सिनेमंमधूनही काम केले आहे. सखी आणि सुव्रत “दिल, दोस्ती, दुनियादारी’मध्ये पहिल्यांदा एकत्र होते. ही मालिका गाजली त्याचे कारण म्हणजे यातील सहाही सहकलाकार एकदम फ्रेश, नवीन आणि युवा पब्लिकचे रिप्रेझेंटेटिव्ह असल्याचे भासत होते. याच मालिकेतले कैवल्य, आशु, ऍना, मीनल ही अन्य पात्रे साकारणारे कलाकार आता मराठी सिनेमा, नाटक आणि सिरीयलमध्ये अन्यत्र स्थिरावली आहेत.

सखीची ही पहिलीच मलिका होती. त्यापूर्वी सखीने “रंगरेझ’ या हिंदी मालिकेत छोटी भूमिका केली होती. त्याशिवाय ती मॉडेलिंगमध्येही सक्रिय आहे. “दिल, दोस्ती…’चा सिक्‍वेल असलेल्या “दिल, दोस्ती दोबारा’मध्येही हे दोघे एकत्र होते. तेथेच या दोघांचे सूत जुळल्याचे समजले आहे.

मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. या सोहळ्यात ‘दिल दोस्ती दुनियादारी’ आणि ‘अमर फोटो स्टुडिओ’ ची टीम उपस्थित होती. यांच्या लग्नाचे पिक्‍स सोशल मीडियावर देखील शेअर करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.