किवळे, (वार्ताहर) – येथील हिंदू स्मशानभूमीत स्वयंसेवकांनी येथे अनेक सुविधा निर्माण केल्या. तीन वर्षांपूर्वी येथे महापालिकेच्या वतीने डिझेल भट्टी बसविण्यात आली. त्यास ८६ हजार रुपये खर्च आहे. मात्र, इमातरीचे काम अपूर्ण असल्याने ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी नागरिकांना सुविधा मिळत नाहीत.
या स्मशानभूमीला आमदार बाळा भेगडे यांच्या निधीतून २५ लाख रुपये, खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून २५ लाख रुपये मिळाले आहेत. त्यावर फरशी बसविणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, नवीन वेटिंग रूम, स्वच्छतागृहे, वॉचमन खोली, रस्ता सुशोभीकरण अशी कामे झाली आहेत. स्मशानभूमीत गेल्यावर डाव्या बाजूला इमारत उभारणी केलेली आहे. तेथे डीजल भट्टीची इमारत आहे. मात्र, या इमारतीत काम अपूर्ण असल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ती तशीच आहे.
हिंदू स्मशानभूमीत आतापर्यंत गंगाराम लांगे, उमेश ओव्हाळ. विशाल खंडेलवाल, कृष्णा दाभोळे अशा अनेकांनी योगदान दिले. त्यामुळे येथे नवीन प्रतीक्षा रुम बांधली. अंत्यसंस्कारासाठी नवीन चार ठिकाणे बांधली. सुशोभीकरण झाले, आंघोळीसाठी व बाथरूमसाठी स्वतंत्र कक्ष बांधण्यात आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने या ठिकाणी दोन रखवालदार नेमले आहेत. डिझेल भट्टीसाठी वास्तू बांधून तयार आहे. मात्र, उर्वरित खर्च तसेच काम कोण करणार यावर चर्चा सुरू असल्याने ही वास्ती वापरावीना पडून आहे.
पाठपुरावा करून महापालिकेने यंत्र मंजूर केले आहे. यंत्र इमारतीत बसवण्यात आले आहे. किरकोळ पेंटिंग चिमणी बसवणे अशी कामे राहिली आहेत येत्या आठ – पंधरा दिवसात ही कामे पूर्ण होऊन दोन ते तीन आठवड्यांचे कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात येईल. त्यानंतर ही भट्टी सुरू होईल. – विशाल खंडेलवाल, माजी नगरसेवक.