वनविभागाचे काम कौतुकास्पद : त्वरीत रस्ता केला मोकळा
विशाल भालेराव
खडकवासला : रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सिंहगड घाटात दरड पडली. गडावर जाताना पहिल्या दिड किलो मीटरच्या अंतरावर जगताप मातीचा पुढचे वळण असलेल्या परिसरात दरड पडली आहे. यामुळे घाट रस्ता बंद झाला आहे.सकाळची वेळ असल्याने वाहतूक तुरळक होती.त्यामुळे सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही.
रात्रभर गडावर पावसाची संततधार होती. या दरडीचा भाग ठिसूळ असल्याने दरवर्षी पावसाळ्यात दरड पडण्याची शक्यता असतेच , सकाळची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली. असे येथील सामाजिक कार्यकर्ता माऊली कोडीतकर यांनी ‘प्रभात’ शी बोलताना सांगितले. दरड पडल्याचे कळताच वरिष्ठांना माहिती देऊन गडावर जाणारा रस्ता गोळेवाडी, व कोंढणपूर बंद केला होता . असे वनरक्षक बाळासाहेब जीवडे यांनी सांगितले.
तसेच सिंहगड परिसरात सलग पाऊस पडत असल्याने दरडी पडण्याचा धोका आहे. असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, घाट रस्ता वाहतुकीसाठी रविवारी सकाळी काही तासासाठी बंद ठेवला होता. कालातरांने नेहमी प्रमाणे घाट रस्ता चालू करण्यात येईल असे वनपाल बाबासाहेब लटके यांनी ‘प्रभात’शी बोलताना सांगितले.
नितीन गोळे,रमेश खामकर, अर्जुन वाघे, गणेश सांबरे, निलेश सांगळे, ,हेमंत गोळे,शंकर डोंगरे, निलेश पायगुडे वन संरक्षण समिती आणि वन विभागाने दरड काढण्यास सुरुवात केली आणि काही तासातच घाट रस्ता पुर्ववत केला .