पुणे – बोगस क्रीडा प्रमाणपत्राची कीड क्रीडा क्षेत्रातून हद्दपार व्हावी, यासाठी लवकरच क्रीडा क्षेत्रासाठी आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे, असा खुलासा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने केला आहे.
नाशिकमध्ये 83 व्या राज्य टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संघटनेने ही माहिती दिली आहे. बोगस प्रमाणपत्र प्रकरणामुळे क्रीडा संघटनेची काळी बाजू समोर आली आहे. त्यामुळे खेळाडूंचे खूप नुकसान झाले. असे प्रकार घडू नये यासाठीच क्रीडा क्षेत्रासाठीही आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे.
बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी अशोक दुधारे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही त्याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे.
याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात ऑलिम्पिक भवनाचीही निर्मिती केली जाणार आहे.