फिरोजपूर (पंजाब) – सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने भारतीय हद्दीत घुसलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला पकडून त्याला पाकिस्तान रेंजर्सच्या स्वाधीन केले आहे. त्याने पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात अनवधानाने भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. त्याला सीमेवर दक्ष असलेल्या जवानांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे पुर्ण चौकशी केली असता कोणतीही आक्षेपार्ह सामग्री किंवा शस्त्रे सापडली नाहीत.
आपण अनावधानाने भारतीय हद्दीत घुसल्याची कबुली त्याने दिली. त्याची खात्री पटल्यानंतर त्याला पाकिस्तानी सैनिकांच्या हवाली करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला पाकिस्तानी नागरिकानचे नाव रहमत अली (72)असे असून हा पाकिस्तानमधील कसूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले. त्याच्याकडे वैयक्तिक सामानाशिवाय काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. अनवधानाने सीमा ओलांडणाऱ्यां पाकिस्तानी नागरीकांच्या संबंधात बीएसएफने नेहमीच मानवीय दृष्टीकोन स्वीकारला आहे.