नाशिक – महात्मा गांधी, ज्योतीराव फुले, साई बाबा आदींच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे भिडे गुरुजी यांच्या विरोधात माळी समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने समाजात तेढ निर्माण होत असल्याचा दावा करीत मंगळवारी (दि. 4) भिडे यांच्या विरोधात धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला.
माजी आमदार योगेश घोलप, व्यापारी बॅंक संचालक सुधाकर जाधव, कामगार नेते जयंत गाडेकर, शिवसेना युवानेते योगेश गाडेकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले कला व सांस्कृतिक मंडळ व माळी समाजाचे ज्येष्ठ नेते,
पदाधिकारी व पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर संतोष गाडेकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वांजळे यांनी सांगितले.