औरंगाबाद – “ऍडिनो’ या डोळे येण्याच्या साथीच्या रूग्णांनी आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. डोळ्यांच्या या आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने राज्यातील अनेक जिल्हांमध्ये वाढत असून त्यामुळे नागरिक हैराण आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक लाखापेक्षा अधिक लोक डोळ्याच्या या आजाराने सध्या हैराण आहेत. पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे व्हायरस पसरण्याची आयती संधी मिळते आहे. ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. त्यामुळे आपल्याला वारंवार घाम येतो आणि यामुळे आपण आपला चेहरा पुसत राहतो. चेहरा पुसताना आपण डोळ्यांनाही हात लावत राहतो. या सर्व कारणांमुळे संसर्ग होतो आणि डोळे येण्याची साथ पसरत आहे. डोळे येण्याची लक्षणे- 1. डोळे लाल होणे, खाज येणे. 2. वारंवार पाणी गळणे. 3. डोळ्यांना सूज येणे व त्यातून चिकट द्रवपदार्थ येणे. 4. डोळे जड वाटणे आणि काहीतरी गेल्यासारखे वाटणे. काय काळजी घ्यावी? 1. डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे. 2. इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसू नये. 3. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये, नियमित हात धुणे. 4. घराबाहेर जाताना गॉगल वापरा. 5. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. 6. डोळे आलेल्यांना वेगळे ठेवणे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या बुलडाणा -13,550 पुणे- 8,808 अकोला-6,125 अमरावती- 5,538 धुळे -4,743 जळगाव-4,717 गोंदिया 4,209 औरंगाबाद- 2478