मुंबई – बॉलिवुडची क्वीन कंगणा रणावत सध्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकची तयारी करते आहे. तसेच, तामिळ सुपरस्टार अरविंद स्वामी चित्रपटात ‘एमजीआर’ यांचा रोल साकारत आहे. या बायॉपिकचे नव “थलाइवी” असे असणार आहे.
दरम्यान, जयललिता यांच्या आयुष्यावरील हा बायोपिक वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटात जयललिताच्या किशोरावस्थेपासून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेतला जाणार आहे. जयललिता यांची भाची जे. दीपा यांनी बायोपिकविरोधात मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे. या बायोपिकवर आक्षेप नोंदवत त्यांनी स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
”जयललिता या दिग्गज नेत्या होत्या आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयी चित्रपट केल्यास त्यांच्याशी निगडीत व्यक्तीसुद्धा त्यात येतात. त्यामुळे चित्रपटात माझा उल्लेख असल्यास त्याविषयी मला काहीच सांगण्यात आले नाही. माझ्या खासगी आयुष्याविषयी चित्रपटाच्या कथेत, संवादात उल्लेख असल्यास मला ते जाणून घेण्याचा अधिकार आहे,” असं दीपा म्हणाल्या.
Former Tamil Nadu Chief Minister J Jayalalithaa’s niece Deepa Jayakumar (in file pic) moves Madras High Court to restrain the release of a biopic on J Jayalalithaa’s life. pic.twitter.com/UV01gMsUNG
— ANI (@ANI) November 1, 2019