जेरुसलेम – इस्रायलच्या भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याजवळ खोल समुद्रामध्ये तब्बल 900 वर्षे जूनी तलवार सापडली आहे. खोल समुद्रामध्ये स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या पाणबुड्यांना ही तलवार सापडली आहे. ही तलवार इस्रायलच्या धर्मयुगाच्या काळातील असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
इस्रायलच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका पाणबुड्याला खोल समुद्रात प्रचंड पुरातन अवशेष मिळाले आहेत. त्यामध्ये अनेक जूनी भांडी आणि एक मीटर लांब तलवारीचाही समावेश असल्याचे इस्रायलच्या पुरातन विबागाने म्हटले आहे.
पाण्यात पोहायला गेलेला हा माणूस समुद्रकिनाऱ्यापासून 150 मीटर अंतरावर आणि 5 मीटर खोल पाण्यामध्ये पोहत होता. ही जागा पूर्वीच्या काळी जहाजांना नांगर टाकून थांबण्यासाठी राखीव होती, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
त्यामुळे याठिकाणी अनेक पुरात वस्तू सापडत असतात. त्यातील काही वस्तू 4 हजार वर्षांपूर्वीच्याही असतात. मात्र या ठिकाणची वाळू सातत्याने वर खाली होत असते, त्यामुळे तेथील जमिनीची खोली सतत कमी जास्त होत असते.
ज्या व्यक्तीला ही तलवार सापडली त्याने ती सरकार जमा केली आहे. ही तलवार अंदाजे 900 वर्षे जूनी असावी असा तज्ञांचा अंदाज आहे. या तलवारीवर शेवाळे चढलेले होते. त्यामुळे या तलवारीची दार कमी झाली आहे. लोखंडाची तलवार असल्याचे प्रथमदर्शनी लक्षातयेते आहे, असे पुरातन विभागातील तज्ञ निर दिस्तेलफेड यांनी सांगितले.
ज्या कालात तलवारीचा वापर युद्धात फारच नव्याने व्हायला लागलेला होता, त्या काळातील मौल्यवान ऐवज सापडल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सुमारे 1000 वर्,ांपूर्वी युद्धात धनुष्यबाण आणि चिलखतांचा वापर व्हायला लागला होता. त्याचकाळातील ही तलवार असल्याचा अंदाज आहे.