नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार सोमवारी समाप्त झाला. आता पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या 71 जागांसाठी आज मतदान सुरु झाले आहे.
Bihar Minister and BJP leader Prem Kumar arrives at a polling booth in Gaya to cast his vote wearing a mask with his party’s symbol. #BiharElections2020 pic.twitter.com/PAerqVerNs
— ANI (@ANI) October 28, 2020
यातच नीतीश सरकारचे मंत्री प्रेम कुमार कमळ चिन्ह असलेला मास्क लावून मतदानासाठी आले. मात्र त्यांच्या या अंदाजामुळे ते आता सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. देशात कोरोनाचे संकट पाहता लोकांनी करोनाच्या गाइडलाइन्सची काळजी घेत त्यांनी मास्कचा वापर केला मात्र , प्रेम कुमार कमळ चिन्ह असलेला मास्क लावून मतदानासाठी आल्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मतदारांना एक आवाहन केले आहे. देशात कोरोनाचे संकट पाहता लोकांनी करोनाच्या गाइडलाइन्सची काळजी घेत मास्कचा वापर करावा. असं मोदी म्हणाले आहे. करोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच एखाद्या राज्यात निवडणूक होत आहे.