बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याने अल्पावधितच आपल्या जबरदस्त स्टंटच्या मदतीने चाहत्यांमध्ये ऍक्शन हिरो म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर टायगरचे “अनबिलिव्हेबल’ हे पहिल गाण सप्टेंबर महिन्यात रिलीज करण्यात आले होते. या गाण्याच्या माध्यमातून टायगरने गायन क्षेत्रात डेब्यू केले होते.
या गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता टायगरने त्याची आणखी एक आवृत्ती जाहीर करण्याची घोषणा केली आहे. याची एक झलक त्याने इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, गायनाच्या माध्यमातून आपले आभार मानण्यासाठी आणि त्यासाठी काही ओळी समर्पित करण्याचा विचार आहे. कमिंग सून. हॅशटॅगयूआर”अनीबलिव्हेबल’.
इंस्टाग्रामवरील या एका छोटयाशा क्लिपमध्ये टायगर श्रॉफ हा मायक्रोफोनसमोर उभे राहून आपले गाणे गुणगुणताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून असंख्य चाहत्यांनी यावर कमेंटस् करत लाईक्स् दिले आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास टायगर श्रॉफ लवकरच दिग्दर्शक अहमद खान यांच्या “हीरोपंती-2′ या चित्रपटात झळकणार आहे.