बॉलीवडूची देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती सतत आपल्या चाहत्यांना स्वत: बनविलेले मीम्स, फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. प्रियांकाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती व्हाइट ट्रॅकसूटमध्ये दिसत आहे. यासोबत निकचा एक फोटो आहे, ज्यात तोही अशाच ट्रॅकसूटमध्ये दिसतोय. हा फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले की, “निक जोनसचे कपडे चोरताना खूपच मज्जा येते.’
प्रियांकाची ही पोस्ट चाहत्यांना आवडली असून ती सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या फोटोत प्रियांकासोबत पेट डायना देखील दिसत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी प्रियांकाने
“द व्हाइट टायगर’ चित्रपटाचे काही फोटो शेअर करत आपला फर्स्ट लुक रिलीज केला होता. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास प्रियांका चोप्रा आपल्या आगामी “मॅट्रिक्स-4′ चित्रपटाच्या शूटिंगसाठी जर्मनीला रवाना झाली आहे. यात तिच्यासोबत कॅरी-ऍन मोस, कियानू रीव्स या मुख्य भूमिका साकारात आहेत. करोना व्हायरसमुळे रोखण्यात आलेले या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच बर्लिन येथे पुन्हा सुरू करण्यात आले आहे.