मुंबई- झी मराठीवरील अगं बाई सासू बाई ही मालिका थोड्या काळात प्रचंड लोकप्रिय झाली. ती मालिका आता महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळतो आहेच, पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत.
मध्यंतरी सोहमच्या म्हणजेच आशुतोष पत्कीच्या कारनाम्यामुळे शुभ्राने म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिकेत मंगळसुत्र काढून फेकले होते.
आता अॅनीव्हरसरीच्या निमित्ताने सोहमच्या हाताने शुभ्रा मंगळसुत्र घालणार असं मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात येत आहे.
या मालिकेतील कलाकारांवर येणारे ‘मिम्स’ देखील व्हायरल होत आहेत. मालिकेत आतापर्यंत बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत. सोहमचे आक्रस्ताळ वागणे, आसावरीचे त्याला पाठीशी घालणे, शुभ्राची घर सांभाळताना होणारी तारेवरची कसरत सगळे काही प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ठरले आहे. आता लवकरच मालिकेत खास सोहळा पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे मालिकेत आता नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.